
तालुका प्रतनिधी : गणेश बेतवार
पांढरकवडा : मौजा पाटणबोरी येथील सौ.सुगुना मोहन कोरेवार,उपाध्यक्षा: महिला भाजापा.आघाडी तालुका केळापुर यांनी भाजपा हा महिलांचा सन्मान करणारा पक्ष आहे.समस्त भाजपा. महिला पदधिकारी यांनी 2024 मध्ये होणाऱ्या विधान सभा निवळनुक करीता आर्णी – केळापुर मतदार संघा करीता स्थानीक उमेदवार नीताताई आंनदराव मडावी.(बोरेले) उच्च विद्या विभुषित असून कार्यक्षम तसेच सामान्य लोकांच्या समश्याची जाणीव असलेल्या महिला उमेदवार इच्छुक आहेत. त्या मतदार संघातील मौजा घाटंजी येथील आनंदराव उन्द्राजी मडावी. प्रसिध्द कबड्डी पटटू आणि निवृत पोलीस उपनिरीक्षक, यांची मुलगी असून आर्णी तालुक्यातील कुरहा (ढुमणी) येथील मोहन तोडसाम यांची नात असून पांढरकवडा येथील व्हिसल ब्लोअर, सामाजिक कार्यकर्ते रजनीकांत डालूरामजी बोरेले यांची पत्नी आहे. अश्या तिन्ही तालुक्याशी नात असलेल्या नीताताई मडावी या महिला उमेदवार आहे त्यांना उमेदवारी दिल्याने भाजपा पक्षा ला फायदा होईल. स्थानीक उमेदवार असून मतदार संघा बाहेरील उमेदवार आयात करण्याचा डाव भाजपा करीत नसून काही संधी साधु स्वार्था पोटी बाहेरील आयात करण्याचा पर्यत्न करीत आहे. विशेष बाब म्हणजे केंद्र मध्ये महिला सशक्तिकरण बिल पास केला त्या वेळी महिलांना राजकारणात 35℅ टक्के आरक्षण देण्याचे अभिवचन दिले होते त्याच पार्श्वभूमि वर विधान सभेत भाषनातून आदरणीय नेत्यांनी दोन वर्ष पूर्वी आरक्षणा विषयी म्हटले होते.आम्ही यवतमाळ जिल्ह्यात फक्त एक उमेदवारी आर्णी – केळापुर मतदार संघा करीता निवेदना द्वारे समस्त महिला भाजपा आघाडी तालुका केळापुर यांनी श्री,मोहनजी भागवत,सर संघचालक,श्री,देवेंद्रजी फडणवीस,उपमुख्यमंत्री,श्री, नीतीनजी गडकरी,केंद्रीय मंत्री,श्री, सुधीरजी मुनगंटीवार,वन मंत्री,श्री, चंद्रकांत बावनकुळे, प्रदेश अध्यक्ष,भाजपा. श्री, मदन येरावार,आमदार ,यांना मागितली आहे. भाजपा पक्ष नेत्यांवर आम्हा महिला पदधिकारी यांना प्रगढ़ विश्वास असून नीताताई मडावी(बोरेले),यांना उमेदवारी बहाल करुण पक्षातील महिला यांच्या भावनांचा आदर करुण संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील महिलांचा सन्मान करणार असा ठाम विश्वास असल्याची मार्मिक प्रतिक्रिया सौ. सुगुना मोहन कोरेवार उपाध्यक्षा महिला भाजपा.तालुका आघाडी केळापुर यांनी व्यक्त केली आहे.
Discussion about this post