शिरूर अनंतपाळ पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी, गुन्हेगारांवर पडली भारी
प्रतिनिधी शिरूर अनंतपाळ/वाल्मीक सूर्यवंशी. शिरूर अनंतपाळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विठ्ठल दराडे यांना गुन्हेगारी प्रवृत्तीला रोखण्यात चांगले यश आल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत तालुक्यातील अवैध धंद्यांविरोधात ५१ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असून ३ लाख रुपयांपर्यंतचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
तालुक्यात आतापर्यंत जबरी दरोडा एकच गुन्हा नोंदवण्यात आला आहे.गेल्या दोन चार वर्षांपासून या पोलिस स्टेशनला आतापर्यंत चार पाच पोलिस निरीक्षक येऊन गेले पण त्यांना कधी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील गुन्हेगारीवर, अवैध धंद्यांविरोधात म्हणावे तेवढे यश प्राप्त झालेले नाही.
परंतु पोलिस निरीक्षक विठ्ठल दराडे यांची नियुक्ती झाल्यापासून त्यांनी तालुक्यातील गुन्हेगारी जगताचा संपूर्ण अभ्यास करून तालुक्यातील सक्षम पाच बीट त्यामध्ये साकोळ, हिसामाबाद, येरोळ, हिपळगाव आणि शिरूर अनंतपाळ तर एक पोलिस चौकी निटूर येथील पोलिस जमादारांची विशेष अशी बैठक घेऊन तालुक्यातील गुन्हेगारी, अवैध धंदे, जबरी चोरी, दरोडे, यांची सविस्तर माहिती घेऊन अवैधधंद्यांविरोधात मोहिम उघडली.
चौकट :- कायदा हातात घेऊ नका..
राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करत असताना कोणीही कायदा हातात घेऊ नये. आंदोलन करताना लोकशाही मार्गाचा वापर करावा, जातीय, धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, अवैध धंद्यांविरोधात कारवाईची मोहीम अशीच सुरू राहणार आहे. विठ्ठल दराडे, पोलिस निरीक्षक.
Discussion about this post