44 Total Views , 1 views today
प्रतिनिधी :- अहमद अन्सारी पाथरी परभणी.निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 85 वर्षा वरील वयोवृद्ध व 40% जास्त दिव्यांग व्यक्तींना घरबसल्या मतदान करण्याची सुविधा मतदारांच्या विनंती अर्जानुसार देण्याचं सूचना होत्या त्या नुसार पाथरी विधानसभा मतदार संघात 85 वर्षांवरील वयोवृद्ध 528 व दिव्यांग 48 असे एकूण 576 मतदार यांनी घरी बसून टपाली मतदान करण्याची सुविधा पुरवण्यासाठी निवडणूक विभागाकडे इच्छा दर्शवली होती मतदारांचे इच्छेनुसार त्यांना घरबसल्या मतदान करता यावा यासाठी पाथरी विधानसभा मतदारसंघात 16 पथका मार्फत 14 ते 16 नोव्हेंबर अशी तीन दिवस टपाली मतदान करण्याची सुविधा प्रशासनाकडून देण्यात आली पहिल्या यामध्ये 85 वर्षांवरील वयोवृद्ध 485 व दिव्यांग 46 असे एकूण 531 मतदारांनी घरी बसून आपल्या मतदानाचे हक्क टपाली मतदान द्वारे बजावले आहेत.
टपाली मतपत्रिका साठी स्वतंत्र कक्ष श्री सुनील कावरखे तहसीलदार सोनपेठ यांचे देखरेख खाली काम करत असून त्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन श्री शैलेश लाहोटी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पाथरी हे करीत आहेत.प्रतिनिधी :- अहमद अन्सारी पाथरी परभणी.
Discussion about this post