दौंड तालुका प्रतिनिधी -बोरीपार्धी, दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथे बिबट्या च्या अडीच वर्षांच्या बालकाचा मृत्यू .
मांडवगणफराटा येथील घटना ताजी असतानाच आज
दौंड तालुक्यातील बोरीपार्धी मधील मगरमळ्यामध्ये बाळू टेंगले यांच्या ऊसाच्या शेतामध्ये ऊस तोडणी चालू असताना ऊसतोडणी मजूराच्या अडीच वर्षांच्या बालकावर हल्ला केला , ऊसतोडणी कामगारांनी त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न अयशस्वी झाला.
सदर बालकाला हर्ष मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते परंतु बालकाचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
बोरीपार्धी,वरवंड ,चौफुला परिसरात भरपूर वेळा बिबट्याचे दर्शन झालेले आहे तरी लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे या बिबट्याच्या हल्ल्यामुळे ऊसतोड कामगारांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
दौंड तालुक्यात उसाचे क्षेत्र भरपूर प्रमाणात असल्याने तेथे कारखाना व गुऱ्हाळासाठी ऊसाची मोठ्या प्रमाणात तोडणी सध्या चालू आहे तरी वनविभागाने याकडे दुर्लक्ष करु नये असे गावकऱ्यांची मागणी आहे.
Discussion about this post