संजय फलके, शिरूर तालुका प्रतिनिधी
शिरूर : ग्रामीण भागातील मराठी शाळांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शाळांमध्ये भौतिक सुविधांसह शिक्षक भरतीही गरजेचे असल्याचे प्रतिपादन विद्याभारती शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव, श्री. जयवंत सरोदे सर यांनी केले.
संस्थेचे ता.शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी श्री.डी.एन .ताठे माध्यमिक विद्यालय असून १९९४ पासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे.
विद्यालय औद्योगिक क्षेत्रात असून विद्यालयात स्थानिक विद्यार्थी यांच्यासोबतच औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगार वर्गाची बहुसंख्य मुले शिक्षण घेत आहेत.
विद्यालयात सध्या ३५० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत .
औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या तसेच स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहकार्यामुळे या शाळेत भौतिक सुविधा तसेच डिजिटल शिक्षणासाठी आवश्यक असणारे शैक्षणिक साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे.
कंपन्यांच्या मदतीने सोलर पॅनल बसवल्यामुळे विजेच्या बाबतीतही शाळा स्वयंपूर्ण होणार आहे.
परंतु, चालू शैक्षणिक वर्षात जुलै अखेर एकूण मंजूर शिक्षकांपैकी तीन शिक्षक नियत वयोमानामुळे सेवानिवृत्त झाल्याने मान्यता प्राप्त दोनच शिक्षकांसह शाळा चालवताना संस्थेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
त्यामुळे, लवकर शिक्षक भरती होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
Discussion about this post