सारथी महाराष्ट्राचं, प्रतिनिधी – बालाजी गोकनूर
तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे.
कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा परंपरा आहे.कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते. अशी श्रद्धा आहे की, या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चतुर्मास संपतो. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात.हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकत्रपणे साजरा करण्याची रूढी आहे. हिंदू
धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून महत्त्व आहे. तुळस ही भारताच्या सर्व प्रांतांत व सर्व भागांत उगवणारी वनस्पती आहे. बहुतेक हिंदू कुटुंबांच्या घरामध्ये व अंगणात तुळशी वृंदावन असते
Discussion about this post