यावल-प्रतिनिधी | फिरोज तडवी
अत्यंत शांततेच्या मार्गाने पार पडलेल्या मतदान प्रचारास अखेर गाल बोट लागल्याची घटना घडली आहे. रावेर-यावल विधानसभेच्या मतदानाच्या पुर्वीच्या रात्री काही अज्ञात हल्लेखोराकडून यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथील राहणाऱ्या शेती व ठेकेदारीचे व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीला काही राजकीय गुंडानी गैरसमजीतुन मारहाण करण्याचा प्रयत्न करत त्यांच्या वाहनाच्या काचा फोडल्यांची घटना घडली आहे. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की , कमलाकर तुळशीराम पाटील वय ४७ वर्ष राहणार सावखेडा सिम तालुका यावल हे दिनांक २० नोव्हेंबर रोजी रात्री १५ वाजेच्या सुमारास यावल शहरापासुन काही अतंरावर असलेल्या फोरेस्ट नाका,विरावली रोड मार्गाने एमएच १२ एमएम ९९०० या क्रमांकाच्या होंडा जाझ या चारचाकी वाहनाने आपल्या घरी जात असतांना तंबाखु खाण्यासाठी फॉरेस्ट नाक्याजवळ थांबले असता अचानक काही ३०ते ४० वयोगटातील पाच ते सहा मराठी भाषीक अज्ञात ईसमांनी मिळून फिर्यादी कमलाकर पाटील हे राजकारणी शेखर पाटील आहे.
समजुन एका उमेदवाराच्या विरूद्ध पैसे वाटप करीत असल्याचे गैरसमज करून पाटील यांची कॉलर पकडून शिवीगाळ करून त्यांच्याकडील लोखंडी रॉडने चारचाकी वाहन गाडीच्या चारही बाजुच्या काचा त्यांच्या खिशातीत पाकीट काडून घेतले घटनास्थळावरून पळ काढला . या बाबत कमलाकर पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने अज्ञात व्यक्तिंच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे
Discussion about this post