प्रतिनिधी मोठे वाघोदा-
मोठे वाघोदा (ता.रावेर) येथे ७०७५ पैकी ५०३८ मतदारांनी हक्क बजावला. एकूण ७१.१८ टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे येथे बूथ क्र.१० वर रात्री ९ वाजेपर्यंत मतदान चालले.
मोठे वाघोदा येथे ५ ते ११ असे ७ बूथ होते. लोकसभेतील आकडेवारी पाहता विधानसभेत मतदारांमध्ये सकाळी उत्साह दिसला. दुपारी गर्दी कमी झाली. मात्र, ३ वाजेनंतर गर्दी वाढल्याने रांग वाढत गेली. सायंकाळी मजूर शेतातून घरी परतल्यानंतर ही गर्दी वाढली. मात्र, वेळ लागत असल्याचे पाहून काही मतदान मतदान न करता घरी परतले. बूथ क्र.१० वर रात्री ९ वाजेपर्यंत मतदान चालले. दरम्यान, केंद्रावर कर्तव्यावर असलेले होमगार्ड सुकदेव दयाराम धनगर यांचे बोट दरवाजामध्ये अडकुन अर्धवट तुटण्याचा प्रकार घडला. त्यांचेवर फैजपूर येथे उपचार झाले. ही घटना वगळता गावातील संपूर्ण मतदान प्रक्रिया निर्विघ्न पार पडली. कोणतेही वादविवाद झाले नाही. आता सर्व ग्रामस्थांना मतमोजणीची उत्सुकता आहे
Discussion about this post