जळगाव:- जळगाव शहरातील इच्छादेवी चौकात खासगी वाहनात घरगुती गॅस रिफिलींग करत असतांना सिलेंडरचा स्फोट झाला होता. या घटनेत जखमी झालेल्या २३ वर्षीय तरूणीचा पुणे येथील खासगी रूग्णालयात मृत्यू झाला आहे. या घटनेत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. एकाच परिवारातील ५ जणांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. रश्मी संजय तेरवडीया (दालवाला) (वय २३, रा. गणेशपेठ पुणे) असे मयत तरुणीचे नाव आहे.
याबबात अधिक माहिती अशी की, दिवाळीनिमित्त पत्नीसह मुलीला घेवून ते जळगावात राहणारे त्यांचे साडू भरत दालवाले यांच्याकडे आले हाते. याठिकाणी आल्यानंतर ते अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात दर्शनाला जाण्यासाठी त्यांनी संदीप शेजवळ यांचे वाहन भाड्याने घेतले होते
Discussion about this post