मारेगाव, (ता.प्र.). तालुक्यातील घोडदरा येथील ग्रामपंचायत महिला सरपंचांचे वास्तव्य सरकारी जागेवर घर बांधून राहत असल्याचे सिद्ध होताच, घोडदरा येथील रहिवासी संतोष मारोती रोगे यांचे तक्रारी वरून अप्पर जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून अपात्र घोषित करण्यात आले.
घोडदरा येथील रहिवासी संतोष मारोती रोगे यांचे तक्रार अजवरून येथील महिला सरपंचा सुनंदा अशोक आत्राम यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहत असल्याच तक्रारीत नमुद करण्यात आले, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 (1), (ज 3) नुसार अप्पर जिल्हाधिकारी यांनी विवाद अर्जाची पडताळणी करून घोडदरा ग्रामपंचायत सरपंच सुनंदा अशोक आत्राम यांना अपात्र ठरविण्यात आले आहे.
Discussion about this post