१०६ फुलंब्री विधानसभा मतदारसंघाची उद्या दिनांक २३/११/२०२४ रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. सदरील मतमोजणी गरवारे हायटेक फिल्मस् लि., चिकलठाणा, एम.आय.डी.सी, जि. छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. मतमोजणी स्थळापासुन ३०० मिटर परिसरात भ्रमणध्वणी , शस्त्र , धातुची अवजारे , अमली पदार्थ बाळगण्यास बंदी करण्यात आली आहे.
सदर मतमोजणी एकुण २७ फे-या मध्ये होणार असुन यासाठी एकुण 200 कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहे. एकुण १४ टेबल द्वारे ई. व्हि. एम. द्वारा करण्यात आलेल्या मतांची मतमोजणी होणार आहे . तसेच एकुण ६ टेबलवर पोस्टल मतदान व गृह मतदान याची मतमोजणी करण्यात येणार आहे. एका टेबल वर सैनिकी मतदारांचे टपाली मतदान मोजण्यात येणार आहे. हि सर्व प्रक्रिया मतमोजणीचे निरीक्षक विजेंद्र हुड्डा यांच्या निरिक्षणात होणार आहे अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी ब्रिजेश पाटील व सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी कृष्णा कानगुले व सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी परेश चौधरी यांनी दिली.
Discussion about this post