उपरोक्त विषयान्वये मी अर्जदार आपणास विनंती अर्ज करतो की, आपल्या झाडी गावातील बहुसंख्य युवापिढीला वाचनालयासाठी मालेगाव अथवा मनमाड शहराकडे जावे लागते त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होते व आर्थिक अडचणही निर्माण होते…
तसेच झाडी गावातील बहुसंख्य तरुण हे पोलीस भरती व आर्मी भरतीच्या तयारी करतांना अभ्यासासाठी व व्यायामशाळेसाठी बाहेरगावी जावे लागते.
त्यामुळे आपल्या झाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये गावातील तरुणांसाठी सुसज्ज वाचनालय व व्यायामशाळा सुरु केल्यास गावातील तरुणांची मोठी सोय होईल जेणेकरुन गावातील युवा तरुणांचे भविष्य उज्वल होण्यास मदत होईल.
तरी सदर अर्जाद्वारे आपणास विंनती करण्यात येते की, आमच्या सदर अर्जाची दखल घेवून झाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये सुसज्ज वाचनालय, अभ्यासकेंद्रे व व्यायामशाळा सुरु करण्यात यावी ही विनंती…
अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाची पदाधिकारी कडून करण्यात आली
Discussion about this post