.
ठाणे प्रतिनिधी / मनोज अंबिकर
ठाणे जिल्ह्यातील कल्याण मतदार संघात यावेळी चुरशीची लढत होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. या लढतीत प्रमुख उमेदवार म्हणून शिवसेना शिंदे गटातील आमदार श्री.विश्वनाथ आत्माराम भोईर आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना उबाठा श्री.सचिन दिलीप बासरे यांची कणखर लढत रंगली होती. याशिवाय, भारतीय जनता पार्टी चे माजी आमदार नरेंद्र बाबूराव पवार यांचा पाठिंबा आमदार भोईर यांना मिळाला होता, ज्यामुळे लढत अधिकच रंगत गेली होती.
पण मतदारसंघातील जनतेने मोठ्या प्रमाणावर श्री.विश्वनाथ आत्माराम भोईर यांच्या बाजूने कौल दिला. विकासाच्या कामांवर आधारित त्यांची लोकप्रियता आणि प्रत्येक संकटात जनतेच्या मदतीला धावून येणारा त्यांचा कार्यकर्ता म्हणून ठळक ठरलेला चेहरा यामुळे कल्याण मतदार संघातील जनतेने त्यांना १२६०२० मतांचा लीड दिला.
विजयानंतर आयोजित सभेत श्री.विश्वनाथ आत्माराम भोईर यांनी कल्याण सर्वांगीण विकासाची ग्वाही दिली. त्यांनी सांगितले, कल्याणच्या प्रत्येक भागाचा विकास हा माझा ध्यास आहे. येणाऱ्या काळात आम्ही या परिसरात पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य अशा मूलभूत सुविधांचे जाळे निर्माण करू.
आपला विश्वास ठेवल्याबद्दल मी मतदारांचा आभारी आहे आणि यापुढे कल्याण एक उज्ज्वल भवितव्य देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.”
श्री.विश्वनाथ आत्माराम भोईर यांचा विजय हा कल्याण च्या जनतेने दाखवलेल्या विश्वासाचा प्रतीक ठरला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कल्याण तालुक्याचा विकास होईल, असे मत अनेक प्रगल्भ विश्लेषक आणि स्थानिक नेत्यांनी व्यक्त केले आहे.
Discussion about this post