मंठा प्रतिनिधी:- गोपाल जाधव 9970805590
डॉ.बि.बि.प्रधान सर सम्यक प्रबोधन संघ संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली न्यु इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मंठा येथे संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी शाळेचे प्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. उध्दव मोरे सर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली यावेळी संविधान तयार करण्यासाठी २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवस लागले.
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी पूर्ण होऊन त्याचा स्वीकार करण्यात आला. यानंतर, १ वर्षानी म्हणजेच २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना लागू करण्यात आली. २०१५ मध्ये भारत सरकारने २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.
अशी माहिती विद्यार्थ्यांना दिली.यावेळी विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा परिधान करून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तर भाषणे,व गित गायन करून उपस्थितांचे मने जिंकली.या वेळी विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती राठोड मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन सिमा निर्वळ यांनी मानले यावेळी परमेश्वर चव्हाण,राम जाधव,रंगारी मॅडम,भारती गुज्जर,खरात मॅडम,राजेश मोरे,अजय कदम ,राम चव्हाण शिवाजी पौळ व शाळेचे सर्व कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी विशेष मेहनत घेतली…
Discussion about this post