वैजापूर प्रतिनिधी अर्जुन शिंदे.
वैजापूर येथे साई बालाजी कंपनी ट्रेडिंग चे मालक सागर राजपूत या व्यापाऱ्यांनी 400 हून शेतकऱ्यांचे दोन कोटी रुपये घेऊन फरार झाला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समिती कार्यालय समोर आंदोलन करून बाजार समिती सभापती रामहरी बापू जाधव व संचालक संजय पाटील निकम यांना सांगितले. परंतु बाजार समिती सभापती रामहरी बापू जाधव यांनी एक महिन्यापूर्वी असे सांगितले की त्या व्यापाऱ्यांनी पैसे नाही दिले तर बाजार समिती सर्व शेतकऱ्यांचे पैसे देईल, असे सांगण्यात आले होते.
विधानसभेच्या निवडणुका झाल्या की आचारसंहिता संपली की सर्व शेतकऱ्यांचे पैसे देण्यात येईल. परंतु निवडणुकाही झाल्या पण शेतकऱ्यांचे पैसे काही मिळेना. व आता ते सांगतात की बाजार समितीचा व त्या बालाजी कंपनी ट्रेडिंग व मालक सागर राजपूत यांचा काहीही देणे घेणे नाही. त्यामुळे बाजार समिती तुमचे पैसे देणार नाही असे बाजार समिती सभापती रामहरी बापू जाधव यांनी शेतकऱ्यांना सांगितले. त्यामुळे शेतकरी आक्रमक होऊन तेथेच आंदोलन करण्यासाठी बसले.
बाजार समिती संचालक अविनाश पाटील गलांडे यांनी असे सांगितले की त्या व्यापाराची जी काही मालमत्ता असेल ती हस्तगत करावी व सर्व शेतकऱ्यांचे पैसे देण्यात यावे असे बाजार समिती संचालक अविनाश पाटील गलांडे यांनी बाजार समिती सभापती व संचालक संजय निकम यांना सांगितले.
जोपर्यंत सर्व शेतकऱ्यांचे दोन कोटी पेक्षाही अधिक रक्कम आहे ती रक्कम जोपर्यंत शेतकऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत वैजापूर कांदा मार्केट, भुसार मार्केट, मका मार्केट व उपवास समिती शिऊर येथील मार्केट बंद ठेवण्यात येईल असा ठराव अविनाश पाटील गलांडे यांनी लेखी स्वरूपात बाजार समिती सभापती रामहरी बापू जाधव यांना सर्व शेतकऱ्यांच्या समोर देण्यात आला.
Discussion about this post