कांदा बाजारातील एक व्यापाऱ्याने ४०६ शेतकऱ्यांनी विकलेल्या कांद्याची तब्बल २ कोटी ५ लाख ७५ हजार रुपयांची रक्कम न देता फरार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून काल दुपारी शेकडो शेतकऱ्यांनी बाजार समितीत सभापती व सचिव यांना घेराव घालत चांगलाच राडा घातल्याने घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात होता.
दरम्यान, जोपर्यंत रक्कम मिळत नाही, तोपर्यंत बाजार समितीचा ताबा सोडणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने सभापती विरुद्ध शेतकरी असा संघर्ष समितीत पेटला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी दीड महिन्यांपूर्वी बाजार समितीत असलेल्या साई बालाजी ट्रेडिंगचे मालक सागर राजपूत यांना जवळपास ४०६ शेतकऱ्यांनी तब्बल २ कोटी ५ लाख ७५ हजार रुपयांचा कांदा विकला होता. या शेतकऱ्यांना व्यापारी राजपूत यांनी पुढील तारखेचे चेक दिले होते. परंतु हे सर्व चेक वटले नाहीत.
त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांनी एक महिन्यापूर्वी बाजार समितीच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकून जोपर्यंत आमची रक्कम मिळत नाही तोपर्यंत आम्ही कांदा मार्केट सुरु करू देणार नाही, अशी भूमिका घेत पाच दिवस मार्केट बंद पाडले होते. त्यावेळी सचिव व व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून वेळ मागून घेतली होती.
परंतू मुदत संपल्यानंतर शेतकरी पुन्हा व्यापाऱ्याकडे आपली रक्कम मागण्यास गेले असता व्यापारी फरार झाल्याचे कळाल्याने सोमवारी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी थेट बाजार समितीत सभापती रामहरी जाधव व सचिव प्रलाद मोटे यांना घेराव घालत चांगलाच राडा घातल्याने घटनास्थळी मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात
आला आहे.
दरम्यान जोपर्यंत आमची रक्कम मिळत नाही तोपर्यंत आम्ही बाजार समिती चालू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती.
Discussion about this post