विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि ‘भाऊंच्या’ अभिनंदनाचे डिजिटल नि मिरज शहरच व्यापून टाकले. शहराच्या विद्रुपीकरमध्ये आणखीनच भर पडली, त्यात हौशी कार्यकर्त्यांनी आपल्या फोटो बरोबरच ‘भाऊंच्या’ आमदार पदाच्या अभिनंदनाचे बोर्ड रस्त्यावर इमारतींवर लावून जणू एकमेकांच्यात स्पर्धाच सुरु केली महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे या डिजिटल हटवण्याच्या मोहिमेत सातत्य नसल्याने डिजिटल बाजी सध्या मिरजेमध्ये फोफावली आहे. यासंदर्भात आमच्या प्रतिनिधींनी मिरज मधील अतिक्रमण पथकाचे प्रमुख सहा आयुक्त अनिस मुल्ला यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले आमच्या विभागा तर्फे अनधिकृत विनापरवाना डिजिटलस हटवण्याची मोहीम सुरूच आहे. काही वेळा राजकीय नेत्यांचे फोन येत असतात मात्र प्रशासन काळामध्ये आयुक्तांचे आदेश आम्हाला महत्वाचे आहेत त्यांच्या आदेशानुसार आमची कारवाई सुरूच राहणार आहे. काही स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते युवा नेते अशी बिरुदे मिरवलेली मंडळी बेधडक विनापरवाना फलक विविध चौकांमधून लावून शहराचे विद्रुपीकरण अधिकच वाढवत आहेत.मात्र प्रशासन काळात आयुक्त शुभम गुप्तांनी सुरुवातीपासून या विनापरवाना डिजिटलस हटवण्याबाबत कठोर निर्णय घेतला त्याप्रमाणे उपायुक्त वैभव साबळे याना तसे आदेशही दिले प्रभाग समिती चार चे सहा आयुक्त अनिस मुल्ला यांनीही आदेशाप्रमाणे मोहीम तीव्र केली आहे.
Discussion about this post