
कुरुंदा प्रतिनिधी : गिरगांव येथील बहिर्जी स्मारक विद्यालयातील १४ वर्ष आतील व १७ वर्ष आतील थ्रो बाॅल स्पर्धेत दोन्ही संघाला जिल्हास्तरीय थ्रो बाॅल स्पर्धेत विजेतेपद प्राप्त झाले आहे . नुकत्याच बहिर्जी स्मारक विद्यालय वसमत येथे जिल्हास्तरीय थ्रो बाॅल स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत बहिर्जी स्मारक विद्यालय, गिरगाव येथील १४ वर्ष आतील व १७ वर्ष आतील खेळाडू संघ सहभागी झाले होते या दोन्ही संघांनी आपआपल्या गटात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकविला आहे . त्यामुळे पुढे विभाग स्तरावर या संघाची निवड झाली या संघासाठी संजय नाकोड सर ,क्रिडा शिक्षक विलास नादरे , व शेख अयुब यांचे मार्गदर्शन लाभले होते . या यशा बद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर , सचिव माजी आमदार पंडीतराव देशमुख , शाळा समितीचे अध्यक्ष शंकरराव कऱ्हाळे पाटील , मुख्याध्यापक प्रकाश इंगळे , पर्यवेक्षक चंद्रकात राऊत यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .
Discussion about this post