राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा व महिला मेळावा आज कोपरगाव येथे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार साहेब व आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पार पडला. ह्या कार्यक्रमाला कोपरगाव मतदारसंघातील नागरिक, विशेषतः महिलांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली.
आशुतोष हा कामाला माझ्यासारखाच पक्का असून कोपरगावच्या विकासासाठी वेळ – काळ न पाहता तो प्रयत्न करतो असे गौरवोद्गार मा.ना.श्री. अजितदादा पवार साहेब यांनी आशुतोषदादांबद्दल बोलताना काढले. आशुतोषदादांनी मागणी केल्याप्रमाणे श्री एकलव्य व वीर महाराणा प्रताप यांच्या स्मारकासाठी तसेच कोपरगावला अत्याधुनिक सुविधांनी युक्त क्रिडा संकुल उभारण्यासाठी निधी देणार असल्याचे आणि
पश्चिमेला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवुन कोपरगावमधील शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी कोपरगाव मतदारसंघातील जनतेला दिले आहे.
यावेळी आमदार आशुतोषदादा काळे यांच्यावरील ‘आमच्या आशुतोषदादाला तोडच नाय’ ह्या गाण्याचे लॉंचिंग आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार मा.श्री. प्रफुल्लजी पटेल साहेब, प्रदेशाध्यक्ष खासदार मा.श्री. सुनीलजी तटकरे साहेब, माजी आमदार मा.श्री. अशोकदादा काळे, महिला प्रदेशाध्यक्षा मा.सौ. रुपालीताई चाकणकर,
आमदार मा.श्री. अनिलजी पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष मा.श्री. सूरजजी चव्हाण, जिल्हाध्यक्ष मा.श्री. कपिलजी पवार, गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका मा.सौ. पुष्पाताई काळे, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका मा.सौ. चैतालीताई काळे, आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद – पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post