चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील टेरव गावचे रहिवाशी दिवंगत महादेव अर्जुन गमरे व रंजना महादेव गमरे यांचे ज्येष्ठ सुपुत्र देवेंद्र महादेव गमरे यांची स्टेट जीएसटी विभागात असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स क्लास – 1 पदी नुकतीच पदोन्नती झाली.
देवेंद्र गमरे यांचा परिवार मुंबईत वास्तव्यास असून उच्चशिक्षित आहे. त्यांच्या पत्नी रीमा गमरे राज्यकर निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत तसेच त्यांचे लहान बंधू महेन्द्र गमरे महाराष्ट्र शासनाच्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापक पदी कार्यरत आहेत, तर त्यांच्या वहिनी मिनल गमरे नाबार्ड बँकेत सहाय्यक महाव्यवस्थापक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. त्यांचे दुसरे बंधु राजेंद्र गमरे “प्रथम” या सामाजिक संस्थेत “डीओपी” म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या विवाहित भगिनी अर्चना जाधव या पेटिट लायब्ररी फोर्ट मुंबई या संस्थेत हेड लायब्ररीयन म्हणून कामकाज पाहत आहेत.
विविध शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात त्यांचे नेहमीच मार्गदर्शन व मोलाचा सहभाग असतो. आईवडिलांचे आशीर्वाद, कठोर परिश्रम या मुळे देवेंद्र गमरे यांची या उच्चपदी नियुक्ती झाली आहे. या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून ग्रामस्थ, ग्रामपंचायत टेरव, विविध सामाजिक शैक्षणिक संस्था, नातेवाईक आणि मित्र मंडळीने देवेंद्र गमरे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Discussion about this post