प्रतिनिधी सुधीर गोखले
मिरज हि वैद्यकीय पंढरी म्हणून सर्वश्रुत आहे .आजमितीस शहर आणि परिसरात शेकडो दवाखान्यांमधून रुग्णसेवा दिली जाते. त्याचप्रमाणे महापालिकेचा एक दवाखाना शहराच्या मध्यवर्ती भागात पूर्वीपासून रुग्णसेवेत आहे. मिरज शहरातील लक्ष्मी पुतळ्याजवळ हा दवाखाना आहे. या जागेवर आता शंभर खाटांचे सुसज्ज रुग्णालय आहे विशेष करून महिलांसाठी प्रसूती विभाग प्रस्तावित आहे. तत्कालीन नगरसेविका डॉ नर्गिस सय्यद यांनी पाठपुरावा करून हे रुग्णालय आणि त्यासाठी निधी मंजूर करूनही घेतला. मंत्री डॉ सुरेश खाडे यांनी नारळही फोडला मात्र अजूनही या जागेवर काहीही हालचाल दिसत नाही सरकारकडे निधीही आहे. पण लाल फितीतल्या कारभाराची प्रचिती पुन्हा एकदा नागरिकांना पहायला मिळाली. या जागेमध्ये सध्या महापालिकेचा दवाखाना कार्यरत आहे तो इतरत्र हलवून हि जागा प्रशासनाला हस्तांतरित करणे आवश्यक आहे. मात्र अजूनही यासाठीही प्रतीक्षाच आहे. १८६४ साली संस्थानकाळात या रुग्णालयाची इमारत उभी राहिली. मिरज हायस्कुल साठी बांधण्यात आलेली हि इमारत हायस्कुल चे स्थलांतर झाल्याने रुग्णालयाच्या वापरासाठी हस्तांतरित झाली. १९५५ साली शासनाने हि जागा नगरपालिकेला रुग्णालय वापरासाठी देऊ केली नंतर या जागेच्या आजूबाजूला दुकानगाळे वाढले अतिक्रमणेही वाढली. सध्या येथील रुग्णालयात एक्स रे विभाग बाह्य रुग्ण विभाग प्रसूती विभाग कार्यरत आहेत. याच जागेत सुमारे ४६ कोटीं रु च्या निधीतून शंभर खाटांचे रुग्णालय उभे राहणार आहे निधीही शासनाकडे आहे मात्र अजूनही हालचाल शून्यच आहे. दोन्ही निवडणुकांच्या आचारसंहितेच्या कात्रीत हे काम रखडले आता काम कधी सुरु होणार याची मिरज कर नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार असे दिसते .
Discussion about this post