संजय अनमवार मदणापुर..
माहूर तालुक्यातील सायफळ हा पेंड लिलाव झाला नसून त्या नदीपात्रातून दिवस रात्र रेती उपसा होत आहे. तरी महसूल प्रशासनाला याबाबत माहित आहे का नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. सायफळ हा पेंड सर्वात मोठा शासनाला महसूल जमा करणारा पेंड असून या पेंडामधून शेकडो ब्रास रेती उपसा होत आहे.
पण या गोष्टीकडे तहसील प्रशासन गप्प का किंवा यांना आर्थिक माया पोटी लालसा आहे. का असा प्रश्न निर्माण होतो. सायफळ मदनापुर या सध्याचे तलाठी मंडळ अधिकारी यांना ही अवघं रेती उपसा दिसत नाही का ?
किनवट तालुक्याचे उपविभागीय अधिकारी यांच्या दहशतीमुळे मागील काही दिवसात पुर्वी रेती उपसा बंद होता, पण या एक महिन्यापासून सायफळ मधून आयुर्वेद रेती उपसा धुमधडाक्यात चालू आहे. दररोज दहा-पंधरा गाड्या रात्रंदिवस रेती उपसा करतात पण या गोष्टीकडे महसूल खातं दुर्लक्ष करत आहे. ही बाब अतिशय वाटते..
Discussion about this post