

लोणार ता प्र :- सुनिल वर्मा
दिनांक 30 /11/2024 रोजी श्री सिद्धेश्वर विद्यालय सुलतानपूर या ठिकाणी श्री सदानंद पाटील तेजनकर यांच्या वाढदिवसानिमित्त सुरज भैय्या साठे यांच्या संकल्पनेतून सर्प शिक्षा अभियान असा एक जनजागृती कार्यक्रम शनिवारला सकाळी 9 ते 11 या वेळेत निसर्ग मल्टीपर्पज फाउंडेशन आणि मी लोणारकर टीम च्या वतीने घेण्यात आला. मेहकर व लोणार परिसरातील सर्व सर्पमित्र मंडळी या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री धांडे सर पर्यवेक्षिका सौ देसाई मॅडम व वडगाव तेजन येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष श्री सदानंद पाटील तेजनकर साहेब तथा सर्पमित्र व सर्प अभ्यासक विनायक कुलकर्णी सर, मी लोणारकर टीम चे पक्षीप्रेमी व सर्पमित्र सचिन कापुरे, सर्पमित्र विलास खरात, सर्पमित्र बंटी नरवाडे, सर्पमित्र चंदू अंभोरे,सर्पमित्र ऋतिक सुसर, सर्पमित्र कमलेश आगरकर, सर्पमित्र वैभव बाभूळवार तथा सुरज भैय्या साठे, बंडूभाऊ पडघान व विदर्भ कन्या शाहीन ताई पटेल इत्यादी उपस्थित होते.
अतिशय सुंदर असे प्रत्यक्ष मार्गदर्शन निसर्ग मल्टीपर्पज चे संस्थापक श्री विनय कुलकर्णी सरांनी केले. जगातील देशातील व आपल्या परिसरातील प्रत्यक्ष दिसणारे सापांचे वर्णन व त्यांची अतिशय सुंदर अशी माहिती या कार्यक्रमातून दिली व त्यांच्या या सामाजिक कार्याला श्री सिद्धेश्वर विद्यालय सुलतानपूर च्या वतीने खूप खूप शुभेच्छा व अनेक आशीर्वाद देण्यात आले..
Discussion about this post