
धर्माबाद तालुका प्रतिनिधी चैतन्य घाटे:- 30 नोव्हेंबर वर्धा येथे शिकाई असोशियन महाराष्ट्र यांच्यामार्फत सिल्वर पंचविसावी जुबली राज्यस्तरीय मार्शल आर्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .
यामध्ये हुतात्मा पानसरे हायस्कूल धर्माबाद येथील इयत्ता सातवी मध्ये शिकणारी रागिनी काशिनाथ पांचाळ मार्शल आर्ट (ki)या प्रकाराच्या वयोगट 14 मध्ये राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले आहे. विद्यार्थिनीच्या या यशाचे कौतुक धर्माबाद शहरात सर्वत्र होत असून मार्शल आर्ट चे ग्रँडमास्टर दत्तात्रेय सीतावार तर क्रिडा शिक्षक गणेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले आहे..
Discussion about this post