
मिळालेल्या माहितीनुसार संगमनेरातील माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे नाशिक पदवीधर मतदारसंघातील आमदार सत्यजित तांबे यांनी काही दिवसापूर्वी मुंबई येथील देवगिरी या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित दादा पवार यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.
संगमनेर मध्ये यांच्या भेटीमुळे तरकवितर्क लावण्यात येत आहे. आगामी विधानसभेत माजी मंत्री थोरात यांचा झालेला पराभव ही बातमी ताजी असतानाच सत्यजित तांबे यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने नगर जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळभर दिसत आहे. या बाबत आमदार सत्यजित दादा तांबे यांनी ही भेट काही कामानिमित्त होती असे सांगितले..
Discussion about this post