जि. प. प्राथमिक शाळा मांडवगण फराटा शाळेला स्मार्ट टीव्ही व साऊंड सिस्टिम सप्रेम भेट…
आज दिनांक 3 डिसेंबर 2024 वार मंगळवार रोजी शाळेसाठी ज्ञानोपयोगी भेटवस्तूंचा दातृत्व सोहळा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री.योगेश भैय्या फराटे यांनी भूषवले आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे फेटे बांधून स्वागत करण्यात आले. आपण ज्या समाजात राहतो समाज त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो याच भावनेतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडवगण फराटा येथे श्री. विकास सुदाम फराटे ,श्री. राहुल बाळासाहेब फराटे (RR कन्स्ट्रक्शन) श्री.राम जगताप (तंटामुक्ती उपाध्यक्ष मांडवगण फराटा) श्री.गोरख शेठ चौगुले, श्री. मच्छिंद्र चौगुले यांनी शाळेला दोन स्मार्ट टीव्ही आणि श्री. अशोक निंबाळकर व श्री .संदीप निंबाळकर यांनी त्यांच्या कन्येच्या वाढदिवसानिमित्त साऊंड सिस्टिम शाळेला भेट दिली.
शाळेतील शिक्षिका सौ. अर्चना जगताप यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.
या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय योगेश फराटे , श्री . आसिफ शेख , श्री .आकाश सूर्यवंशी इत्यादी उपस्थित होते.शाळेच्या वतीने मान्यवरांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
श्रीमती माधुरी बावणे मॅडम यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले. यावेळी श्री आप्पा संकपाळ श्री. चंद्रकांत काकडे, श्री.सागर राहींज,श्री. शरद मुळे, श्रीम.दीप्ती शिंदे,हे शिक्षक उपस्थित होते.

Discussion about this post