निवडणूक संपली की लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट माजी मंत्री म्हणाले महायुतीकडून राज्यातील महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ करण्यात येईल अशी आम्ही महायुतीच्या सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आपल्या जाहीरनाम्यात दिली होती त्यानंतर आता आज भाजपच्या मोठ्या नेत्याकडून याबाबत माहिती देण्यात आली असून ही वाढ नेमकी कधी होईल याबाबत खुलासा केला आहे.
भाजपचे नेते तथा मंत्री सुधीर मुनगंटीवार. यांनी लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या रकमेत महायुतीकडून निश्चित वाढ होणार असून ही वाढ कधी होईल याबाबत माहिती देण्यात आली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती वेळी त्यांनी याबाबत भाष्य केले आहे. त्यामुळे आता महायुतीची सत्ता स्थापन झाल्यावर लवकरच राज्याच्या लाडक्या बहिणीसाठी गोड बातमी देण्यात येईल अशी शक्यता आहे. राज्यातील 21 वर्ष व 65 वर्षापर्यंत वयोमर्यादा असलेल्या महिलांना महायुती सरकारच्या लाडकी बहीण या योजनेतून प्रत्येक महिन्याला 1500.रुपयांची आर्थिक मदत केली जाते आतापर्यंत सुमारे दोन कोटी महिलांना या योजनेचा लाभ झाला. असल्याचा दावा महायुतीच्या मंत्र्याकडून करण्यात आलेला आहे. या रकमेत आता लवकरच वाढ केली जाणार असल्याचं सुधीर मनगुंडीवार यांनी म्हटले आहे.
ते पुढे बोलताना म्हणाले की ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या वर आहे अशा लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार नाही. लाडक्या बहिणी योजनेत कर भरणाऱ्या महिलांचा अर्ज अपेक्षित नाही ये लाडक्या बहिण योजनेसाठी जे आधीचे निकष आहेत. तेच कायम राहणार आहेत. दरम्यान सुधीर मनगुंडीवार यांच्या या वक्तव्यानंतर आता ज्या कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखाच्या वर आहे किंवा ज्या महिला कर भरतात मात्र तरीदेखील त्यांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे. त्याचे अर्ज बाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गरज पडल्यास मी स्वतः सरकारकडे मागणी करेल….,..
एका मुलाखतीत सुधीर मुनगुंडीवार यांना प्रश्न विचारण्यात आला त्यानंतर त्यांनी याबाबत उत्तर देताना म्हटलं की लाडकी बहीण योजनेचे मानधन वाढवण्याचे वचन आमच्या संकल्प पत्रात आम्ही आमच्या बहिणींना दिले आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे मानधन निश्चितपणे वाढेल. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेतला जाईल. आगामी अर्थसंकल्पात सरकार या योजनेच्या रकमेत वाढ करू शकते. ही योजना रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सुरू झाली होती. त्यामुळे रक्षाबंधनाला देखील याची रक्कम वाढवून दिली जाऊ शकते. अद्याप निश्चितपणे त्यासंदर्भात सांगता येणार नाही. मात्र तशी गरज वाटली तर मी स्वतः या संदर्भात सरकारकडे मागणी करेल असं. मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
Discussion about this post