धुळे.
विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाकडून विविध प्रयत्न करण्यात आले. तरीही धुळे शहरात केवळ 58.83% मतदान झाले एकीकडे मतदानाची सुट्टी एन्जॉय करणारे मतदार असताना दुसरीकडे शहरातील शितल हेमंत शर्मा यांनी मात्र पतीच्या निधनानंतर पतीचे शव घरात असताना आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य देत मतदान केले. त्यांची ही कृती सुट्टी एन्जॉय करणाऱ्या मतदाराच्या डोळ्या त झणझणीत अंजन घालणारी ठरली आहे.
धुळे शहर विधानसभा मतदार संघासाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली गेल्या काही वर्षापासून लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सुमारे 60% व त्यापेक्षा कमी मतदान होत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे प्रशासनासह विविध स्तरावरून दरवेळी मतदान जनजागृती करण्यात येते शिवाय सर्वांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सुट्टी देखील जाहीर करण्यात येते. परंतु तरी देखील काही जण हा दिवस सुट्टीचा दिवस म्हणून एन्जॉय करताना दिसतात मतदानाला जाण्यापेक्षा घरी आराम करण्यास प्राधान्य देतात आपण एकट्याने मतदान न केल्यास काय बिघडणार अशी काही ची भूमिका असते अशा मानसिकतेमुळे काल धुळे शहरात केवळ 58.71 टक्के इतकेच मतदान होऊ शकले. एकीकडे सुट्टी समजून एन्जॉय करणारे मतदार असताना दुसरीकडे मात्र शीतल हेमंत शर्मा यांनी काल पतीचे निधन झाले असतानाही मतदानाचा हक्क बजावला काल सकाळपासून मतदान सुरू असताना शितल यांचे पती हेमंत/डालू/गोविंदलाल चौटीया.रा. रसिक लाल अपार्टमेंट. दूध डेअरी जवळ. धुळे हे देखील मतदान करण्यास उत्सुक होते. आपल्याला मत द्यायचे असेल ते पत्नीला सांगत होते. मात्र त्यांना हदेविकाराचा झटका आल्याने त्याचे निधन झाले. यामुळे परिवारावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला परंतु पत्नी शितल यांनी आपले दुःख काही वेळ बाजूला सारून मतदानाचा हक्क बजावला. व पतीची इच्छा पूर्ण केली शितल यांनी राष्ट्रीय कर्तव्याला प्रधान्य देत मतदान केल्यामुळे मतदान न करणाऱ्याच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे.
ही बातमी जुनी आहे पण सर्वांना शिकवणारी आहे असे मला वाटते
राजकुमार शर्मा
Discussion about this post