पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण झाले भुईसपाट
तालुका प्रतिनिधी – समीर बल्की
चिमूर : – चिमूर तालुक्यातील गदगाव येथे बौद्ध समाजाकडून गावातील मोकळ्या जागेवर अतिक्रमण करुण झेंडा व बुद्ध मूर्ती मांडून कुंपन करण्यात आले होते मात्र इतर समाजाकडून याला विरोध आहे करण्यात आले ज्यामूळे गावात तणाव निर्माण झाले.याबाबत २८ नोहेम्बर रोज गुरुवारला पोलिस तथा दंगा नियंत्रण पथकास पाचारण करण्यात आले असून गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे होते.
आज दिनांक ०३/१२/२०२४ रोजी सकाळी ५:०० वाजेपासून तहसीलदार राजमाने यांचे आदेशानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संतोष बाकल . सहायक पोलिस निरीक्षक मल्हारी तालिकोटे. पोलिस उपनिरीक्षक वाघ. व पोलीसांच्या कडक बंदोबस्तात केलेले अतिक्रमण काढण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी नितीन फुलझेले. उपस्थित होते. गावात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक मल्हारी ताळीकोटे पोलिस उपनिरीक्षक रवींद्र वाघ ताफ्यासहित उपस्थित आहेत
Discussion about this post