लातूर :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व महाराष्ट्र राज्य कुराश संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 1 ते 2 डिसेंबर 2024 या कालावधीत रावेत, पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय कुराश स्पर्धेत आमच्या जय भारत मा. व उच्च मा.विद्यालय दापका तालुका निलंगा जिल्हा लातूर येथील इयत्ता अकरावी या वर्गात शिकत असणारा खेळाडू मानसिंह सदानंद बिरादार याने 19 वर्षाखालील वयोगटात 73 किलो वजन गटात रौप्यपदक जिंकून घवघवीत यश प्राप्त केले . त्याने मिळवलेल्या या यशाबद्दल आमचे आधारस्तंभ व श्री श्यामगीर शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय श्री वसंतरावजी पाटील साहेब अध्यक्ष श्री राजेश्वरजी पाटील साहेब सदस्य श्री पांडुरंग रेड्डी सर श्री अनिल भोईबार सर क्रीडा विभाग प्रमुख श्री सुनील तारे सर संपत साळुंके सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे त्याचे अभिनंदन करण्यात आले.
Discussion about this post