पळासनेर प्रतिनिधी
महामार्गावरील हाडाखेड सिमा तपासणी नाक्यावरील खड्डे त्वरित बुजविण्यात यावे अपघात टाळण्यासाठी काँक्रीट बॅरियेट त्वरित हटवण्यात यावे व तोल काट्यावरून येणारे वाहने सरळ मार्गाने काढण्यात यावी या मागण्यांचे निवेदन प्रादेशिक परिवहन विभाग व बॉर्डर नाका अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे
पत्रकार राजेश सराफ यांनी दि १ रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शिरपूर तालुक्यातील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर हाडाखेड सिमा तपासणी नाका असुन येथून रोजच हजारो वाहनांची वाहतूक होत असते सिमा तपासणी नाक्यावर दोन्ही बाजूला चार ते पाच फुटांपर्यंत खड्डे पडले आहेत खड्ड्यात अवघड वाहने अडवून बंद पडतात तर अनेक वेळा अपघात होतात त्यामुळे वाहतूक ठप्प होते
सिमा तपासणी नाक्यावर मुख्य रस्त्यावर काँक्रीट बॅरियेट लावण्यात आले आहेत अंधार असल्यामुळे रात्रीच्या वेळी मोटरसायकल चालकांच्या अंदाज चुकल्याने काँक्रीट बॅरिगेटला मोटरसायकल धडकुन अपघात घडत आहेत त्यात मोटरसायकल चालकांच्या जिव गमवावा लागत असुन त्यात वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे
सिमा तपासणी नाक्यावर तोल काट्यावरून येणाऱ्या वाहना समोरील काँक्रीट बॅरिगेट हटवून अवजड वाहने सरळ मार्गाने काढण्यात यावी जेणेकरून वाहतूक ठप्प होणार नाही या तीन मागण्यांची त्वरित दखल घ्यावी अन्यथा हाडाखेड सिमा तपासणी नाक्यावर तीव्र आंदोलन करण्यात येईल या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची राहिल असे निवेदन देण्यात आले आ
Discussion about this post