तालुका प्रतिनिधी : चंद्रकांत भोरे
शासनाने बंदी घातलेला सुगंधित अवैध गुटखा हदगाव शहरांमध्ये प्रत्येक पान टपरीवर व छोट्या-मोठ्या किराणा दुकानावर राजरोसपणे विक्री होत असल्याचे दिसुन येत आहे यामुळे युवा तरुण पिढी गुटख्याच्या व्यसनाधीन होऊन त्यांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र निर्माण होत आहे याकडे अन्न व औषध प्रशासनाचे अक्षमदुरलक्ष होत आहे. सध्या नव्याने मंत्रिमंडळ स्थापन होण्याची शक्यता असून या बाबीकडे अद्याप पर्यंत कोणाचेही लक्ष जात नाही तरी संबंधित विभागाने या कडे लक्ष देऊन अवैध गुटखा विक्री करणाऱ्या मोठ्या दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे
Discussion about this post