चंदगड:
चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष रविंद्र पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला या बद्दल सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इ सातवी ते दहावी या गटासाठी अनुक्रमे २१ ००, १५००, ११००,९००, ७००, ५००,३०० अशी बक्षिसांची योजना केली आहे. सोबत आकर्षक सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व पुस्तके भेट दिले जाणार आहेत. रविवार दि.८ डिसेंबर रोजी सकाळी १० वा. महात्मा फुले विद्यालय मजरे कारवे येथे स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेमध्येजास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन तालुका समन्वयक मोहन पाटील यांनी केले आहे
Discussion about this post