नायगाव प्रतिनीधी – दिपक गजभारे घुंगराळेकर..
नांदेड जिल्हातील माळेगाव यात्रेच्या नंतर जिल्हातील नायगांव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील श्रीक्षेत्र खंडोबा रायाची यात्रा प्रचंड पद्धतीने दरवर्षी नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर घुंगराळा गावात भरते.
या यात्रेच्या निमित्त जंगी कुस्त्याचा फड ही भरतो गेल्या कोरोना काळा पासून पशु प्रदर्शन भरविले जात नसले तरी यंदा यात्रेच्या निमित्ताने लंपी वायर्सचा धोका नसल्यास पशु प्रदर्शना बरोबर घोड्याचे प्रदर्शन भरण्याची शकता ? यंदा वर्तवली जात आहे.
नायगांव तालुक्यातील श्रीक्षेत्र खंडोबा यात्रेच्या निमित्ताने समस्त गावकऱ्याच्या व ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सदरच्या यात्रेचे प्रचंड नियोजन व आयोजन दरवर्षी करण्यात येते
नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील खंडोबा यात्रेच्या कुस्तीच्या दंगलीत महाराष्ट्र राज्यासह बाहेर राज्यातील महिला कुस्ती गिरा बरोबर बलांडे कुस्ती गीर कुस्त्या खेळणारे पैलवान येणार आहेत
यंदा लंपी व्हायर्सचा धोका नसल्यामुळे या घुंगराळा येथील खंडोबा रायाच्या यात्रेत पशु प्रदर्शना बरोबर घोड्याचे प्रदर्शन भरवण्याचा विचार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्यासह समस्त गावकरी विचार विनिमय करणार आहेत असे समजते आहे.
घुंगराळा येथील प्रचंड यात्रेच्या निमित्त जिल्हा परिषद नांदेड च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या संदर्भात कोणते आयोजन व नियोजन करणार असल्याचे सर्वांचे लक्ष लागून असून खरे तर जिल्हा परिषद नांदेडच्या अधिकाऱ्यांनी ह्या यात्रेच्या निमित्ताने कोणती व्यवस्था करणार अशी चर्चा होतांना ऐकावयास मिळत आहे….

Discussion about this post