सुलतानपूर (प्रतिनिधी हसन खान पठाण)-
३० नोव्हेंबरच्या रात्रीला एका सामान्य कुटुंबातील अश्विनी सुरेश जोहरे वय १९ या विवाहितेने आपल्या माहेरी सुलतानपूर वार्ड नंबर १ या ठिकाणी वडिलांच्या राहत्या घरात आई-वडील झोपलेले असताना स्वतःच्या ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समजते.
या विवाहितेने आपली ओढणी टीन पत्राखाली असलेल्या अँगल ला बांधून गळफास लावून घेतला असे “दिसले आई-वडील झोपेतून उठले असता सकाळी आपली मुलगी त्यांना अँगलला गळफास लावून मृत अवस्थेत दिसून आली. आत्महत्याची नेमके कारण समजू शकलेले नाही आई-वडिलांनी रडायल सुरुवात केली असता शेजारी सर्वच गोळा झाले मुलीचे वडील रमेश याने पोलीस पाटीलपती
राजेश भानपुरे यांना कळविले असता पोलीस पाटील रेखा राजेश भानापुरे व राजेश भानापुरे यांनी घटनास्थळावर धाव घेऊन सत्य परिस्थिती पाहून पोलीस स्टेशन मेहकर यांना फोन करून पाचारण करण्यात आले. मेहकर पोलीस स्टेशन ठाणेदार कड तसेच शिंदे मॅडम यांनी स्थळ निरीक्षण करून पंचांसमक्ष पंचनामा केला आणि मृत मुलीचे पार्थिव शवविच्छेदनासाठी मेहकर या ठिकाणी पाठविण्यात आले.
यावेळी सुलतानपूर ग्रामपंचायत ग्राम विस्तार अधिकारी गजानन कावरके साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. आत्महत्येचे मूळ कारण हे शवविविच्छेदनानंतरच निष्पन्न होईल पुढील तपास मेहकर पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे.
Discussion about this post