आजरा – तालुका प्रतिनिधी,
आजरा येथील मल्टीस्टेट दर्जा असलेली देशातील 21 वी नॉन शेड्युलर नागरी सहकारी बँक व शेड्युलर दर्जा वाटचाल असलेली दि आजरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. आजरा या बँकेच्या डोंबिवली शाखेचे स्थलांतर करण्यात आले आहे
या कार्यक्रमासाठी माजी मंत्री रवींद्र चव्हाण आमदार प्रकाश आबिटकर, माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर,अण्णा -भाऊ समूहाचे प्रमुख अशोक अण्णा चराटी यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार प्रकाश आबिटकर यांनी आजरा अर्बन बँकेने खाजगी व राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे प्रगती केल्याचे गौरवोद्गागार काढले चराटी यांनी बँकेच्या कार्याचा आढावा घेतला
सीईओ प्रशांत गंभीर यांनी बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली. अध्यक्ष रमेश कुरुणकर उपाध्यक्ष सुनील मगदूम डॉ.अनिल देशपांडे डॉ. दीपक सातोस्कर, नगरसेवक रमाकांत पाटील,जालिंदर पाटील, विजयकुमार पाटील अनिकेत चराटी आणि सर्व मान्यवर मंडळी व कमचारी वृंद उपस्थित होते.विलास नाईक यांनी आभार मानले
Discussion about this post