सुलतानपूर: प्रतिनिधी हसन पठाण
ट्रक आणि वाहिकेची समोरासमोर धडक होऊन रुग्णवाहिकेच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला. मंगळवार, ३ नोव्हेंबरच्या रात्री बिबी- दुसरबीड मार्गावरील पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला. रुग्ण
मंगळवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास ही रुग्णवाहिका बिबीकडून दुसरबीडकडे जात होती. या दरम्यान विरुद्ध दिशेने
येणाऱ्या भरधाव ट्रकने पेट्रोल पंपाजवळ या रुग्णवाहिकेला समोरासमोर धडक दिली.
या अपघातात रुग्णवाहिकेचा चालक अक्षय उकंडा (किनगाव जड्डू
आईचा तांडा, ता. लोणार) यांचा जागीच मृत्यू झाला. तर वाहक राजेश्वर वाकळे (वय ३०, रा. वाशी) हा गंभीररित्या जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
जखमींवर बिबी ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले, त्यानंतर पुढील उपचारासाठी जालना येथे हलवण्यात आले. बिबीचे ठाणेदार संदीप पाटील यांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. पुढील तपास बीबी पोलीस करत आहेत.
Discussion about this post