कुरखेडा तालुक्यातील सोनेरांगी येथे ४ डिसेंबर रोजी संगीतमय शिव महापुराण ग्रामगीता भक्ती सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदासजी मसराम माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते दिनेशभाऊ सिडाम, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष जिवन नाट, देसाईगंज पंचायत समितीचे माजी सभापती परसरामजी टिकले, सरपंच बाबुराव कुंभरे , उपसरपंच गुरुदेव निकुरे, पोलीस पाटील ननावरे, ग्रामसेवक टिकले, प्रा. प्रदीप बोडने , अंबादास ढोणे महाराज, कौशल्यजीत कोटांगले, मुन्ना कुमरे, मोहन मोहरले, उमाजी निमजे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार रामदासजी मसराम, माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते दिनेशभाऊ सिडाम यांच्यातर्फे सोनेरांगी येथील हेमाडपंथी शिवालय देवस्थान तसेच मलकापूर येथील साध्वी प. पू. तेजस्विनीदीदी पाठक यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post