उमरखेड भगवान परशुराम सेवा समितीला डांगे कुटुंबाकडून अन्नछत्रदानासाठी अकरा हजार एकशे एक रुपयाची मदतगणेश राठोडतालुका प्रतिनिधी उमरखेडउमरखेड येथील वसंत नगर येथील रहिवासी श्रीमती सुरेखा शशिकांत डांगे यांच्याकडून भगवान परशुराम सेवा समितीला अकरा हजार एकशे एक रुपय अन्नदानासाठी देऊन मदत केली.
उमरखेड परशुराम सेवा समिती मागील अनेक वर्षापासून अन्नछत्र हा उपक्रम राबवत आहे.
ब्राह्मण समाजातील एखाद्या कुटुंबामध्ये दुःखद दुर्घटना घडली असता त्या दिवशी त्या कुटुंबाला शास्त्रानुसार घरामध्ये अन्न शिजवता येत नाही.
त्यामुळे अशा वेळेस त्या कुटुंबातील सर्व सभासदांना अन्नछत्र समिती स्वखर्चाने त्या कुटुंबास घरपोच जेवणाची व्यवस्था करतात. त्यामुळे समाजामध्ये सामाजिक बांधिलकी व प्रेम जोपासल्या जाऊन समाज संघटित करण्याचे कार्य
ही सेवा समिती करत असून या कार्याची सर्व ब्राह्मण समाज बांधवाकडून कौतुक होत असून परशुराम सेवा समितीचे अध्यक्ष संतोष देव, हेमंत चौधरी, सुधीर पोटे, सुनील वानेरे, माधव देशमुख सुनील देशपांडे रवी भाऊ वानेरे , या सभासदाचे मोलाचे योगदान आहे.
Discussion about this post