*व्हाईस ऑफ मीडिया धर्माबाद तर्फे महामानवास आदरांजली! धर्माबाद तालुका प्रतिनिधी चैतन्य घाटे… धर्माबाद-धर्माबाद शहरात आज महामानव घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळपासूनच फुलेनगर स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आदरांजली देण्यासाठी शेकडो आंबेडकरी अनुयायांची रांग लागली होती.
नगरपालिका कार्यालयात सर्व शहरातील प्रत्येक प्रभागात महापरिनिर्वाण दिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रेल्वे स्थानकाच्या प्रांगणातही भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून बऱ्याच ठिकाणी संगीतमय आदरांजलीचे कार्यक्रमही ठेवण्यात आले होते. व्हाईस ऑफ मिडिया पत्रकार संघटना धर्माबाद तर्फेही बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी अध्यक्ष संजय कदम, कार्याध्यक्ष संजय झगडे, उपाध्यक्ष दत्तात्रेय सज्जन, सचिव गंगाप्रसाद सोनकांबळे, राजेश सोनकांबळे, सदस्य चैतन्य घाटे साहेबराव सोनकांबळे यांच्यासह सर्वसन्माननीय सदस्य उपस्थित होते.
Discussion about this post