
जांब :- बोल्डर भरलेला ट्रॅक्टरने लोहारा नहराजवळील वळनावर पलटी झाल्याने टँक्टर चालकाचा जागीच दबुन मृत्यू झाला.
एम .एच 36 सी 747 या क्रमांकच्या ट्रॉली मध्ये बोल्डर भरुन लोहारा मार्गे धोपकडे जाणारा ट्ँक्टर लोहारा नहरा जवळ 7 डिसेंबर रोज शनिवारी ला 4वाजेच्या सुमारास टँक्टर पलटी झाल्याने चालकाचा दबुन जागीच मृत्यू झाला.
जितेंद्र राऊत वय (55) रा.इंदिरानगर मिटेवानी असे मृतकाचे नाव आहे .सदर घटनेची माहिती पोलीस स्टेशन आंधळगाव येथे देण्यात आली काही वेळात ठानेदार सुनील राऊत आपल्या ताप्यासह घटनास्थळी दाखल झाले व पुढील तपास करीत आहेत..
Discussion about this post