
जांब/वार्ताहर(ता. प्र) – मयुर कुथे..
मोहाडी _ आभाळाएवढे दुःख विसरून केले मुलाचे नेत्रदान. सातोना – बीड मार्गावर शुक्रवार (दी. ६डिसेंबर) ला करण रणवीर बांते या १८ वर्षीय मुलाचा अपघाती मृत्यु झाला. करण हा मॉडेल हायस्कूल सातोना येथे इयत्ता १२ वि मधे शिकत होता.
सकाळची शाळा असल्याने मोठ्या बहिणीला मोटरसायकलने शाळेत सोडून तो घराकडे परत येत होता. दरम्यान वाटेत भरघाव टिप्परने जोरदार धडक दिली त्यात करण चा जागीच मृत्यू झाला. एकुलता एक मुलगा अपघातात मृत्युमुखी पडल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरला.
कुटुंबावर मोठा आघात झाला.पण कुटुंबीयांनी आभाळाएवढे दुःख विसरून नेत्रदान करण्याचे ठरविले. अलीकडे आत्मकेंद्री भावनेचा सार्वत्रिक संचार दिसून येतो.मरणोत्तर नेत्रदान केल्यास दृष्टीहिनांच्या जीवनात प्रकाश फिरता येऊ शकतो मात्र पदरात आलेल्या दुःखामुळे निराश न होता दुसऱ्यांच्या जीवनात आशेच्या अंकुर फुलविणारे खरे दातृत्वशील आहेत. बीड येथील रणवीर बांते व त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्यावर आलेल्या अघटीत संकटातही सामाजिक भान जपले आपल्या लाडक्या मुलाच्या निधनानंतर व्यक्तिगत दुःख बाजूला ठेवून त्यांनी मुलाचे नेत्रदान केले.
📍जागरूकतेची गरज..
करण च्या नेत्रदानामुळे दोन अंधांना जग पाहण्याची संधी मिळणार आहे. निसर्गाने मानवाला जन्मजात बहाल केलेत. त्यापैकी एक म्हणजे दृष्टी. डोळ्यांशिवाय जगण्याची कल्पना करवत नाही. परंतु काही अभागी व्यक्ती विविध कारणांमुळे दृष्टी सुखापासून वंचित राहतात. त्यांची जीवन अंधकारमय होते. अशा व्यक्तीच्या जीवनात नेत्रदानाने प्रकाश येऊ शकतो. बांते दांपत्याने मुलाच्या मृत्युचे दुःख बाजूला सारून कारणचे नेत्रदान केले नेत्रसल्य चिकित्सक डॉक्टर प्रिया सयाम, डॉक्टर अमित ढोमणे. यांनी ही प्रक्रिया पार पाडली जिल्हा सल्य चिकित्सक डॉक्टर. दीपचंद सोयाम यांनी करनचे वडील रणवीर बांते यांना धीर देऊन त्यांच्या या समाजाभिमुखतेचे कौतुक केले.
” बांते कुटुंबाने मोठ्या दुःखातून सावरत तरुण मुलाचे नेत्रदान केले. त्यामुळे दोघांना दृष्टी मिळणार आहे. हे अत्यंत महान कार्य आहे. त्यांच्यापासून इतरांनी सुद्धा प्रेरणा घेऊन वर्णोत्तर नेत्रदानाकरिता पुढे यावे.
– डॉ दीपचंद सोयाम.जिल्हा शल्य चिकीत्सक..
Discussion about this post