
कंधार प्रतिनिधी /माधव जाधव..
शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमी अग्रेसर असलेली कंधार तालुक्यातील संभाजी ब्रिगेड या संघटनेची कार्यकारणी दि ६ डिसेंबर रोजी शासकीय विश्रामगृहात नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
बालाजी पा.जाधव जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अनिल पा लाडेकर सामाजीक कार्यकर्ते,मनोहर गौरकर सामजीक कार्यकर्ते,देवानंद पा. मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संदीप पाटील तोंडचीरे तालुका अध्यक्ष,विष्णू पाटील जाधव शहर प्रमुख, शंकर पाटील भूत्ते तालुका उपाध्यक्ष, विकी पा.घोरबांड वि अघाडी, संभाजी राहेरकर तालुका संपर्कप्रमुख यांच्या उपस्थितीत नामदेव पाटील बोरोळे सचिव, किरण पाटील बोरकर सहसचिवपदी ,श्रीनिवास पाटील जोगदंड संघटक,साई पाटील जाधव कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
संभाजी ब्रिगेड युवकांना दिशा देण्याचे काम करत आला असून भविष्यात पण १०० टक्के समाजकारणावर भर देऊन समाजात असलेली बेरोजगारी, शैक्षणिक , सामाजिक , शेतकरी या विषयावर जास्तीत जास्त भर देण्यात येईल व वाढत चाललेले जातीय ध्रुवीकरण थांबविण्यासाठी संभाजी ब्रिगेड ही संघटना कार्य करत राहणार असल्याची ग्वाही मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष संदीप पा.तोंडचिरे यांनी यावेळी बोलताना दिली.
यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक आनंद पा. गारोळे यांनी मांडले तर सूत्रसंचालन संदीप पा. तोंडचिरे यांनी आणि आभार शंकर पा. भुत्ते यांनी मानले. यावेळी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कंधार तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..
Discussion about this post