बीड जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टी व अन्य स्थानिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाले होते, त्यादृष्टीने खरीप 2024 चा पीकविमा अग्रीम 25% प्रमाणे पात्र शेतकऱ्यांना तातडीने वितरित करण्यात यावा त्याचबरोबर 30 नोव्हेंबर रोजी तामिळनाडू राज्यात आलेल्या ‘फेंगल’ चक्री वादळामुळे बीड जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे व फळांचे जे नुकसान झाले, त्यांचे सॅम्पल सर्व्हेक्षण करून शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्याबाबतचे प्रस्ताव प्रशासनाकडून गतीने प्राप्त करून शेतकऱ्यांना मदत दिली जावी, अशी मागणी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कडे पत्राद्वारे केली आहे.
दोन्ही विषयी तातडीने निर्णय घेऊन संबंधित यंत्रणांना निर्देश दिले जातील, असे मा. फडणवीस साहेब व मा.अजितदादा यांनी आश्वस्त केले आहे.
Discussion about this post