चंदगड: आजरा प्रतिनिधी,
डी के शिंदे बी .एड. कॉलेज गडहिंग्लज व माजी विद्यार्थी संघटना बीएड कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने 2024 चा दिनकर मास्तर सर्जनशील पुरस्कार
जनता विद्यालय, तुर्केवाडी येथील सहाय्यक शिक्षक
श्री बाबू नरसू पाटील देण्यात आला .
बी.एन. पाटील यांचे दोन काव्यसंग्रह व दोन कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. मराठी अध्यापक संघाच्या वतीने ते अनेक उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या हा पुरस्कार माजी परीक्षा नियंत्रक शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व थोर शिक्षण तज्ञ, डॉ. बी.एम.हिर्डेकर यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती उर्मिला देवी श्रीपतराव शिंदे व ज्येष्ठ पत्रकार श्री सुभाष धुमे यांच्या उपस्थितीत देण्यात आला.
पुरस्काराचे मानकरी श्री बाबुराव पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये या
यशा पाठीमागे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाने काय दिले व सहकारी शिक्षकांचे सहकार्य कसे लाभले आणि त्यातून आपल्याला नवनवीन उपक्रम राबवण्याची संधी मिळाली, यावर आपले विचार व्यक्त केले . डॉ.बी.एम . हिर्डेकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून सर्जनशील शिक्षकच विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवितो . समाजाला दिशा देण्याचे काम शिक्षक करत असतात ‘ असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.बी एम. हिर्डीकर यांनी केले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती उर्मिला देवी संस्थेच्या इतिहासाचा आढावा घेतला.
दिनकर मास्तर सर्जनशील पुरस्कार देण्या पाठीमागचा मुख्य हेतू त्यांनी सांगितले.
कार्यक्रमालाडॉ. शिवाजी रायकर,सचिव जी एन पाटील सहा, ए के नाईक, पी. एम . ओऊळकर, एम् एम् मुल्ला, विष्णू पाटील शंकर पाटील उपस्थित होते
Discussion about this post