रत्नागिरी:(प्रतिनिधी असलम शेख):
महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस च्या कार्यक्रमानुसार प्रदेश सरचिटणीस व रत्नागिरी जिल्हा प्रभारी श्री मनिषजी राऊत यांच्या निर्देशानुसार जिल्हा उपाध्यक्ष हारीस शेकासन व महिला प्रदेश सरचिटणीस रुपाली सावंत यांच्या नेतृत्वाखाली आज कॉंग्रेस भवन येथे आगामी सर्व निवडणूका EVM बंद करुन बैलेट पेपर द्वारे घेण्याच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु करण्यात आली.
यावेळी शहराध्यक्ष रमेश शाहा जिल्हा उपाध्यक्ष हारीस शेकासन ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष दिपक राऊत यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना EVM बंद करुन बैलेट पेपर द्वारा निवडणूका घेण्याच्या कॉंग्रेस पक्षाच्या मागणी बाबतची वस्तुस्थिति सांगितली.रत्नागिरी शहर व ग्रामीण भागात सह्यांची मोहीम सुरु करण्यात आली.यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी आगामी नगर परिषद निवडणूक कॉंग्रेस ने स्वबळावर लढवावी,अशी मागणी केली.यावर शहराध्यक्ष रमेश शाहा यांनी सर्वप्रथम इच्छुक उमेदवारांनी बूथ कमिट्या बनविण्याच्या सूचना केल्या.तसेच कार्यकर्त्यांच्या भावना प्रदेश कॉंग्रेस कडे कळविण्यात येतील असे आश्वासन दिले.
या वेळी महीला प्रदेश सरचिटणीस रुपाली सावंत, तालुका सरचिटणीस काका तोडणकर,आतिफ साखरकर, असलम शेख,सुदेश ओसवाल,अनिता शिंदे, जैनुद्दीन सारंग,फहिम, सोनाली धोत्रे,अजहर शेख तंवकिर वस्ता, मेहबूब खतीब व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post