भरत पुंजारा
ग्रामीण प्रतिनिधी पालघर
डहाणू तालुक्यातील वेती कातकरीपाडा येथील एका अत्यंत गरजू कुटुंबाची दैन्य अवस्था समजून, युवा परिवर्तन फाउंडेशनने त्वरित मदतीचा हात पुढे केला. या कुटुंबाकडे अन्नधान्याचा कोणताही साठा नव्हता. तांदूळ, डाळ, मीठ, हळद यांसारख्या आवश्यक वस्तूंची कमतरता लक्षात घेऊन, फाउंडेशनने धान्याच्या किटद्वारे त्यांना मदत केली.
सदर मदतीचे वितरण फाउंडेशनचे अरविंद बेंडगा आणि काही सक्रिय सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ही मदत केवळ अन्नधान्य पुरवण्यात सीमित न राहता, सामाजिक एकोप्याचा आदर्श ठरली आहे.
युवा परिवर्तन फाउंडेशनच्या या कार्यामुळे त्या कुटुंबाला आधार मिळाला असून, गरजूंसाठी तत्परतेने काम करणाऱ्या संस्थेचे हे योगदान समाजासाठी प्रेरणादायी ठरते.
Discussion about this post