


✒️ पियूष गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी ✒️
📲9423170716
एटापल्ली,,
. एटापल्ली तालुक्यात येत असलेल्या जीवन गट्टा मधील रोडाची दुरवस्था झालेली आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बांधन्यात आलेल्या रस्त्याची स्ट्रक्चरल इंजिनियर्सची हुक्का पार्टी करतात की काय हे अजूनही ओळखले नाही.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना विभागाद्वारे रोड बनवून दीले परंतु या रोडाला दुरुस्त करून देतं नाही आहेत.
जीवन गट्टा हे गाव एटापल्ली पासून सुमारे 2 कि मी उपरोक्त अंतरावर वसलेले आहे म्हणून लक्ष देत नाही फक्त पगार घ्यायचा आणि कार्यालयात बसून राहायचं असं करुन चालणार नाही, तर रोड बनवून द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गावकऱ्यांचा माहिती नुसार किमान 10 वर्ष होत आले आहे रोडाला परंतु या रोडाला दुरुस्त करून देतं नाही आहेत. लोकांना येण्याची व जाण्यासाठी रस्ता खराब असल्याने रोज झटके खातं यावे लागते आहे.
एटापल्ली डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधान चौक ते जीवन गट्टा या ग्रामीण भागातील नागरिक व शासनाची फसवणूक करणारे कंत्राटदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिकांनसोबत मोठा वाद निर्माण होते.
त्या दृष्टीने न. पं एटापल्ली ने ढसाळ घाण कचरा व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
तसेच नाल्यांची सफाई करून घ्यावी दुर्लक्ष करून चालणार नाही असे ग्रामस्थांनी मागणी केली आहे..
Discussion about this post