
हिमायतनगर ता.प्रतिनिधी-(लक्ष्मण शेन्नेवाडी)
आज दि.१०डिसेबंर रोजी बांगलादेशातील हिंदु जनतेवर होणारे अत्याचार त्वरित थांबवण्यासाठी केंद्र सरकारने कार्यवाही करण्याची मागणीचे निवेदन सकल हिंदु समाजाच्या वतीने प्रशासनास देण्यात आले.
सविस्तर वृत असे कि,बांगलादेश येथे काही महिन्यापासुन हिंदु धर्मातील व्यक्तीवर इस्लामीक कटरपंथी लोकांकडुन सतत अत्याचार केला जात आहे.
हि़दु लोकांची हत्या करणे,हिदु महिलांची व मुलीचा बलत्कार करणे,त्याची घरे व दुुकाने पेटवुन देणे,हिंदुच्या संपतीची व मालमत्तेची लुट करणे,त्याच्या जमिनी व घरे जबरदस्ती बळकावणे,तसेच हिंदु धर्माच्या म़दीराची तोडफोड करणे,मुर्तीची विटबंना करणे,अशा प्रकारे हिंदुचा तेथे अमानुष छळ आहे जागतिक मानव अधिकार कायद्या अंतर्गत सर्व देशानी मिळुन बांगलादेशातील सरकारवर दबाव आणुन हिंदुवर होणारा अत्याचार त्वरित थांबवावा.
जर थांबला नाही तर जगातील सर्व हिंदु धर्मातील लोक रस्यावर उतरतील व जाहिरपणे तीव्र आंदोलन करतील. हिंदु धर्मातील लोकांवर होणार्या अत्याचाराचा आम्ही जाहीर निषेध करत असुन हिंदुवर होणारा अत्याचार त्वरित थांबवावा अशी मागणी निवेदनात सकल हिंदु समाजाच्या वतीने करण्यात आली. यावेळी रामभाऊ सुर्यव़शी़,गजानन चायल,मुन्नाभाऊ जन्नावार,दिक्कतवार सर आदी हजरोच्या संख्येने हिंदु समाज बांधव उपस्तीत होते..
Discussion about this post