
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ रायगड जिल्हा कार्यकारिणी बैठक मोहोपाडा येथे नुकतेच संपन्न झाली.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या रायगड जिल्हा अध्यक्ष सन्माननीय संपादक पत्रकार राकेशजी खराडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक मोहोपाडा येथे संपन्न झाली. यावेळी पत्रकारांच्या विविध समस्या आणि भविष्यात त्यावर काय उपाययोजना करता येईल यावर सर्व पत्रकारांची मते जाणून घेवून पुढील रणनीती ठरविण्यात आली. लवकरच रायगड जिल्ह्याचे अधिकृत संकेतस्थळ आणि कार्यालय रायगड जिल्ह्याच्या मध्यवर्ती
अलिबाग येथे सुरू करावे अशी मागणी पत्रकारांनी केली.
लवकरच अलिबाग येथे कार्यालय सुरू होणार असून सर्व पत्रकारांच्या प्रश्नांना
वाचा फोडण्याचे काम ही संघटना करत राहील आणि पत्रकारांच्या
विविध मागण्यांना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करील येत्या काही दिवसांत माननीय राज्यपाल यांच्या सोबत चर्चा करून प्रलंबित मागण्या आणि पत्रकारांसाठी एक नवीन महामंडळ नेमण्यात येणार आहे. असे यावेळी सूचित करण्यात आले. कर्जत तालुका अध्यक्ष पदी प्रशांत खराडे यांची नियुक्ती करण्यात आली
या बैठकीला जेष्ठ पत्रकार अर्जुन कदम, दिनकर भुजबळ, जनचक्र न्यूज चॅनेलचे पत्रकार कैलासराजे घरत, राकेश खराडे,सुनील पाटील,राहुल जाधव, साबीर शेख, देवा पवार, दत्ता शेडगे, आदी पत्रकार उपस्थित होते.
यावेळी पेण, पनवेल, खालापूर, कर्जत, मोहोपाडा जिल्ह्याच्या विविध भागातील जेष्ठ पत्रकार आवर्जून उपस्थित होते.
अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक संपन्न झाली.तदनंतर सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला..
Discussion about this post